छंद

 

           एका खोली तिल समूहाला छंदा बद्दल विचारणा केली असता संमिश्र मिळतो,काही जण छंद जोपासणारी असतात तर काहींनकडुन नकार  येतो तर त्यातील काही म्हणतात आंम्हाला कसले हि छंद नाहीत ,थोडक्यात त्यांना स्वतःवर "छंदीष्ट"अस कोणतंही लेबल लावून

घ्यायला आवडत नाही तर त्यातलाच काही मंडळीना ज्ञातच नसते कि अमुक ही एक गोष्ट जी आपण वेळात वेळ काढून आवडीने करतो त्यालाच साधारण पणे छंद असे म्हणतात.

छंदाबद्दल बोलतांना मला आपले महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडेंनी सांगितलेले गुज नमुद करावें वाटते,ते अस म्हणतात कि

"आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हांला सांगतो
उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच थांबू नका साहित्य,चित्र,संगीत,नाट्य,शिल्प,खेळ यातल्या एखाद्या कलेशि मैत्री जमवा ,पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेलप ण कलेशि मैत्री तुम्ही का जगायच् हे सांगून जाईल"
इथे कलेशि मैत्री कुठे तरी छंद जोपसण्याबददल सांगून जाते. मागीलवर्षी कोरोनामुळे जवळपास  अख्ख्या जगाला बंद(lock down)चा सामना करावा लागला,वर्क फ्रॉम होम चि संकल्पना ह्या काळात उदयास आली परंतु त्याचा एक विपरीत परिणाम असा झाला कि लोकांचा कामनिमित्त येणारा प्रत्यक्ष संपर्क बंद झाला त्यामुळे प्रत्यक्ष भेटीतनं होणारी भावनांची देवाणघेवाण त्याकाळापुरति संपुष्टात आली,त्यातनं हळुहळू नैराश्याची चादर मनामनांवर पांघरली जाऊ लागली पण "छंदीष्ट" वर्गातील लोकांना फारसा सामना करावा लागला नाही.

 मला आलेल्या कोरना बंदकाळातील आलेल्या अनुभवनबद्दल सांगायचे झालं तर मी पण फावला वेळ चित्र,क्ले पेंटींग्ज बनविणे ह्यात सत्कारणी लावला,सत्कारणी ह्या अनुषंगाने  कि मला त्या पेंटींग्जच्या विक्रीतुन पैसै ही मिळाले,कौतुक मिळाल आणि कुठेतरी त्याने आत्मविश्वासात कणभर का होईना भरच पडली आणि मग कसा तो बंदचा दडपण वाचविणारा काळ गेला हेही समजले नाही.

           माझ्या वर्तुळातील बहुतांशजणांना  पाककलेचे,रेखाटनाचे,चित्रकला,हस्तकला इत्यादींचे छंद आहेत हे त्यांनी ठेवलेल्या व्हाट्सएप स्टेटस वरील पदार्थांचें फोटोज,युट्यूब लिंक्स इत्यादी  समाजमाध्यमांद्वारे समजले   त्यातनं असही लक्षात आल कि आपल्याही सानिध्यात छंदीष्ट वर्गातील मंडळी आहे .थोडक्यात मला इथं असे सांगायचे आहे की छंद जोपासतांना आपली एक वेगळी ओळख निर्माण होऊन त्याद्वारे धनार्जन होऊन मानसिक समाधानही लाभते.

प्रसिद्ध अमेरीकन लेखक डालें  Dave Barry अस म्हणतात कि


'There is very fine line between hobby and mental illness'

म्हणजे छंद आणि मानसिक आजार यांच्यात बारीकीशी ओळ आहे, ती बारीकीशी ओळ ही छंद जोपासताना मिटवली जाऊ शकते व त्यातुन मानसिक आरोग्य निकोप राहण्यास मदत होते असेच कदाचित लेखकाला अभिप्रेत असावे.

शेवटी काय  माणसाला छंद हा का आणि कस जगायच हे शिकवतो


Comments

Post a Comment