छंद
एका खोली तिल समूहाला छंदा बद्दल विचारणा केली असता संमिश्र मिळतो,काही जण छंद जोपासणारी असतात तर काहींनकडुन नकार येतो तर त्यातील काही म्हणतात आंम्हाला कसले हि छंद नाहीत ,थोडक्यात त्यांना स्वतःवर "छंदीष्ट"अस कोणतंही लेबल लावून घ्यायला आवडत नाही तर त्यातलाच काही मंडळीना ज्ञातच नसते कि अमुक ही एक गोष्ट जी आपण वेळात वेळ काढून आवडीने करतो त्यालाच साधारण पणे छंद असे म्हणतात. छंदाबद्दल बोलतांना मला आपले महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडेंनी सांगितलेले गुज नमुद करावें वाटते,ते अस म्हणतात कि "आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हांला सांगतो उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच थांबू नका साहित्य,चित्र,संगीत,नाट्य,शिल्प,खेळ यातल्या एखाद्या कलेशि मैत्री जमवा ,पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेलप ण कलेशि मैत्री तुम्ही का जगायच् हे सांगून जाईल" इथे कलेशि मैत्री कुठे तरी छंद जोपसण्याबददल सांगून जाते. मागीलवर्षी कोरोनामुळे जवळपास अख्ख्या जगाला बंद(lock down)चा सामना करावा लागला,व...